शेत जमीन विकली तर टॅक्स द्यावा लागतो का ? तज्ञ लोकांनी दिले मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Land Sell : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. शेतीशेती करण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. अनेकदा मात्र शेतकरी बांधव शेत जमिनीची विक्री करतात. एका ठिकाणाची जमीन विक्री करून दुसऱ्या ठिकाणी जमीन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

काही शेतकरी बांधव पैशांची अडचणीमुळे जमिनीची विक्री करतात. तथापि, अनेकांच्या माध्यमातून भारतात शेतजमीन विकली तर टॅक्स द्यावा लागतो का ? याबाबत कायदा काय सांगतो, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की आपल्या देशात फ्लॅट, प्लॉट, घर, दुकान आणि इंडस्ट्रियल जमीन म्हणजेच नॉन अग्रिकल्चरल लँड विक्री केल्यास कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो.

अशा परिस्थितीत शेत जमिनीची विक्री केल्यानंतर देखील प्राप्त झालेल्या कॅपिटल वर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो का असा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो.

शेत जमीन विक्री केल्यानंतर टॅक्स द्यावा लागतो का?

काही ठराविक भागांमध्ये असलेल्या शेतजमिनीवर टॅक्स द्यावा लागतो. भारतीय कायद्यानुसार जी जमीन 10,000 पेक्षा जास्त किंवा 1,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून दोन किलोमीटरच्या आत येते अशा जमिनीच्या विक्रीवर टॅक्स द्यावा लागतो.

जर जमीन नगरपालिका किंवा कॅंट बोर्डाच्या हद्दीत येत असेल आणि लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त असेल तरीसुद्धा टॅक्स द्यावा लागणार आहे.

तसेच जी जमीन 100,000 पेक्षा जास्त किंवा 10,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटच्या हद्दीच्या सहा किलोमीटरच्या आत येत असेल तर अशा जमिनीच्या विक्रीवर टॅक्स देणे बंधनकारक आहे.

जर जमीन 10,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कोणत्याही नगरपालिका/कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून आठ किलोमीटरच्या आत येत असेल तर टॅक्स देणे बंधनकारक राहणार आहे. उर्वरित शेत जमिनीच्या विक्रीवर मात्र टॅक्स आकारला जात नाही.

तसेच जर एखाद्या व्यक्तीने जमीन विकल्यानंतर आपल्या मुलांना किंवा पत्नीला पैसे हस्तांतरित केले तर हस्तांतरित केलेले पैसे कराच्या कक्षेत येणार नाहीत. परंतु जमीन विक्रीची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावी लागणार आहेत.

यासोबतच कोणतीही जमीन विकण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मदतीने त्याचे मूल्यांकनही करून घेणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जी शेतजमीन शहरी भागात येते अशा शेत जमिनीच्या विक्रीवर टॅक्स द्यावा लागू शकतो. मात्र ग्रामीण भागातील शेत जमिन विक्रीवर टॅक्स लागत नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा