शेतजमिनीवर घर बांधू शकतो की नाही ? काय सांगतो कायदा, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Land Rules : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटूंबातील असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास आणि कामाची ठरू शकते. खरेतर अलीकडे जागेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. जागेच्या कमतरतेमुळे आता शेतकरी बांधव शेतात घर बांधू लागले आहेत.

अनेकांनी शेतात चांगले टूमदार घर बांधले आहे. जर तुमचीही अशीचं योजना असेल आणि शेतात घर बांधायचे असेल तर थोडं थांबा ! आधी जमिनीवर घर बांधले जाऊ शकते का? याविषयी जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला बांधलेले घर पाडावे लागू शकते.

खरेतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेत जमिनीवर घर बांधले जाऊ शकते की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता.

अशा परिस्थितीत आज आपण शेतजमिनीवर घर बांधले जाऊ शकते की नाही याबाबत कायदा काय सांगतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक, शेतजमिनीशी संबंधित एक अनेक नियम तयार करण्यात आले आहेत, जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत.

शेतजमिनीवर घर बांधले जाते का ?

शेतजमिनीशी संबंधित नियमानुसार, शेतजमिनीवर घर बांधले जाऊ शकत नाही. शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. जमीन मालकाला सुद्धा परवानगीशिवाय शेतजमिनीवर घर बांधता येत नाही.

अशा परिस्थितीत जर तुम्ही शेतजमिनीवर घर बांधले तर तुम्हाला ते पाडावे लागू शकते. दरम्यान जर तुम्हाला शेत जमिनीवर घर बांधायचे असेल तर यासाठी तुम्हाला जमीन अकृषिक करावी लागणार आहे.

म्हणजेच जमिनीचे NA अर्थातच नॉन एग्रीकल्चर लँडमध्ये रूपांतरित करावे लागणार आहे. शेत जमिनीचे नॉन अग्रिकल्चर लँड मध्ये रूपांतर झाल्यानंतर तुम्ही अशा जमिनीवर घर बांधू शकता किंवा कोणताही व्यवसाय थाटू शकता.

मात्र, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम पाहायला मिळतात. पण जेव्हा शेतजमिनी निवासी जमिनीत म्हणजे NA मध्ये रूपांतरित केली जाते, तेव्हा आवश्यक शुल्क देखील भरावे लागते.

याशिवाय तुम्हाला घर बांधण्यासाठी नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून एनओसी घेणे आवश्यक राहणार आहे. शेतजमिनीचे निवासी जमिनीत म्हणजे NA मध्ये रूपांतर करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. यामध्ये जमीन मालकाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

यासोबतच पिकांची नोंद, भाडेकरू व मालकी हक्काची नोंदही आवश्यक आहे. जमीन वापर योजना, सर्वेक्षण नकाशा, जमीन महसूल पावती देखील विचारली जाते. याशिवाय त्या जमिनीवर कोणतीही थकबाकी किंवा कोणताही खटला नसावा हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा