Agriculture Income Tax News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून शेतीमधून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर देखील कर भरावा लागतो का हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यामुळे भारतीय आयकर नियमांनुसार तिच्या उत्पन्नाला देखील कर बसतो का या महत्वाच्या प्रश्नांचे आज आपण उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नोकरदार वर्गासाठी भारत सरकारने सात लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न काही अटींसह माफ केले आहे.
म्हणजे सात लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना आयकर भरावा लागतो. मात्र, वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांनी त्यांच्यावर कोणताही कर लागत नसला तरी देखील आयकर रिटर्न भरला पाहिजे, असे सरकारने म्हटलेले आहे.
अशा परिस्थितीत, शेती मधल्या उत्पन्नाबाबत कर भरण्याबाबत आयकर विभागाचा नियम काय आहे, हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे. वास्तविक, सरकारने कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आयकर नियमांनुसार, शेतीतून किंवा शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. तथापि, काही कृषी उत्पादनावरील उत्पन्न अटी आणि सूट देऊन कराच्या जाळ्यात ठेवण्यात आले आहे.
व्यावसायिक शेतीचे उत्पन्न तसेच शेतमालावर प्रक्रिया करून तयार झालेल्या उत्पादनापासून मिळालेले उत्पन्न हे आयकरच्या कक्षात येते. आयकर कायदा 1961 नुसार, 5,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आयटीआर मध्ये दाखवणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 2 (1A) नुसार, शेतजमिनीवरील काही कृषी क्रियाकलापांशी संबंधित क्रियाकलापांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाला सूट सहित टॅक्सच्या अंडरमध्ये ठेवण्यात आले आहे. जसे की, चहाच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येते. त्याचप्रमाणे कॉफी किंवा रबर लागवडीतून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येते.
मेंढीपालनातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येते. दुग्ध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येते. झाडांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्नही कराच्या कक्षेत आहे. प्राण्यांचा व्यापारही कराच्या कक्षेत येतो. जमीन किंवा इमारत भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न देखील कराच्या कक्षेत येते.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जे कृषी उत्पन्न कराच्या कक्षेत येतात त्या कृषी उत्पन्नावर नेमका किती टक्के कर आकारला जातो, जर एखाद्या शेतकऱ्याने चहाची शेती केली तर त्यातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के कर आकारला जातो, म्हणजे अशा प्रकरणाच्या उत्पन्नावर 60 टक्के करमाफीचा लाभ संबंधितांना मिळू शकतो.
चहा, रबर किंवा कॉफी यांसारख्या पिकांची लागवड व्यावसायिक शेतीच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर केंद्र सरकार करात सूट देते. व्यावसायिक पिकांची यादी राज्यानुसार बदलू शकते आणि त्यावरील कर दर देखील भिन्न असू शकतो.