सध्या शेती व्यवसायातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन प्रयोग करून शेतीत बदल होताना आपल्याला दिसत आहेत. जस-जसे शेतीचे चित्र बदलत आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज ही वाढत आहे.
शेतीला लागणाऱ्या पाण्याची गरज भागवण्यासाठी शेतकरी शेतात शेततळे तयार करून पाण्याचे योग्य नियोजन करून शेतातून उत्पादन घेत आहे. पण शेती बरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत उभारी देणारा व्यवसाय म्हणून मत्स्यपालन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
मत्स्यशेतीतून दुहेरी उद्देश आणि नफास साधता येतो.शेततळ्या मुळे शेतीच्या पाण्याची गरज तर पूर्ण होतेच पण त्याचबरोबर शेततळ्यात मत्स्य पालन व्यवसाय करून शेतकऱ्याला अधिकचा नफा देखील मिळवता येऊ शकतो.
मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय. मत्स्यपालन हे गोड्या पाण्यातील शेततळे मध्ये केले जाते.तर कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी शेततळ्यात सोडण्यात येतात.
साधारण 10 से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी 5 हजार याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावे लागतात. मत्स्यसंवर्धन आधी खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते.बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता 3 ते 4 किंवा 6 प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे सहज शक्य आहे.
शेततळ्यामध्ये मासे सोडण्याच्या अगोदर तळ्यामध्ये खेकडे, वाम, बेडूक असे भक्षक प्राणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर शेततळ्यांमध्ये वापरला जाणारा कागद हा प्लास्टिकचा असल्याकारणामुळे माशांच्या विष्ठेचे विघटन होत नसल्यामुळे पाणी लवकर खराब होते.
यासाठी पाणी बदली करण्याची व्यवस्था करणेदेखील गरजेचे आहे. मत्स्यशेतीसाठी शेततळ्यात बारामहीने पाण्याची आवश्यकता असते.तर चांगल्या प्रतीच्या मत्स्य वाढीसाठी 10 महिन्यांचा कालावधी लागतो.
तर योग्य जोपासना केल्यास माशाची वाढ ही 1 किलोपेक्षा जास्त होते. सर्वकाही नियोजनबध्द झाले तर वर्षभराच्या कालावधीतच भरपूर नफा कमावता येतो.