Electricity Saving Tips :- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झाला असून सगळीकडे अंगाची लाही लाही करणारा उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागला आहे.
त्यामुळे आता प्रत्येक घरामध्ये या उन्हापासून आणि त्या माध्यमातून होणाऱ्या उकाड्यापासून वाचण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कुलर तसेच एयर कंडीशनर म्हणजेच एसीचा वापर केला जातो.
काही काही घरांमध्ये तर अगदी 24 तास एसी सुरू असतो. कारण उन्हाळ्यामध्ये अंगाला गारवा खूप छान वाटतो. परंतु एसीच्या या भरमसाठ वापरामुळे महिन्याकाठी येणारे वीजबिल मात्र प्रचंड येते व आपल्या खिशाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून झटका बसतो.
कारण या कालावधीमध्ये एसीच नाहीतर त्यासोबत घरातील कुलर व फ्रिज चा वापर देखील प्रचंड वाढतो. त्यामुळे विज बिल देखील जास्त येते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये उन्हाळ्यात एसी चा वापर करत असाल व त्यामुळे विज बिल जास्त येत असेल तर या ठिकाणी दिलेले छोटे उपाय केल्यामुळे विजबिल नक्कीच कमी येते.
या टिप्स वापरा व एसीमुळे येणारे विजबिल कमी करा
1- तापमान- तुम्हाला एसीच्या माध्यमातून येणारे बिल जर कमी करायचे असेल तर सगळ्यात अगोदर त्याच्या तापमानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एसीचे तापमान 24 ते 27 डिग्री सेल्सिअस वरच ठेवावे. जेवढे तुम्ही एसी चे तापमान नियंत्रणामध्ये ठेवतात तितकेच पाच ते सहा टक्क्यांपर्यंत तुमचे विजेचे युनिट कमी वापरले जाते.
2- एसीचा टायमर सेट करा- बरेचदा आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा हॉलमधील एसी बंद करण्याची आठवण पडते. अशावेळी एसीला टायमर लावून ठेवावा. म्हणजेच तुम्हाला रात्री झोपताना जर एसी बंद करायची आठवण जरी पडली तरी तो टाईमर लावल्यामुळे ऑटोमॅटिक बंद होतो.
3- दारे खिडक्या बंद ठेवाव्यात- जेव्हा तुम्ही एसी सुरू करता तेव्हा रूमचे सर्व दारे खिडक्या बंद कराव्यात. कारण त्यामुळे रूम पटकन थंड व्हायला मदत होते व रूम पुरेसा थंड होण्यासाठी जास्त विजेचे युनिट देखील लागत नाहीत. तसेच खिडक्या बंद केल्या तरी उन्हाच्या झळा येऊ शकतात म्हणून काचांसाठी पडदे लावून घ्यावेत.
4- एसीची काळजी घेणे- एसीमध्ये जो काही एअर फिल्टर असतो तो नेहमी स्वच्छ करून घ्यावा. एसी अस्वच्छ असेल तर तो काम करताना त्याला जास्त वीज लागते. त्यामुळे वेळच्या वेळी त्याची स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे.
5- एसीची सर्विसिंग करून घ्यावी- एसीची सर्विसिंग व्यवस्थित केल्यामुळे तो कार्यक्षमतेने काम करतो व विजेचा वापर कमी होतो. ज्या ठिकाणी तुम्ही एसी इन्स्टॉल केलेला आहे तिकडची जागा स्वच्छ ठेवावी. त्यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो आणि विजेचा वापर कमी व्हायला मदत होते.