Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. खरेतर आधार कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे. भारतात आधार कार्डचा उपयोग शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. शिवाय इतरही अन्य महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे.
सिम कार्डसाठी देखील आधार कार्ड लागते. मात्र अनेकांना या अशा महत्त्वाच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे याबाबत माहिती नसते.
अशा परिस्थितीत, आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण आधार कार्ड कोणत्या मोबाईल नंबरसोबत लिंक आहे हे कसे चेक केले पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे हे कसं चेक करायचं
मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे हे चेक करण्यासाठी टेलीकॉम ऍनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागणार आहे. नंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपी असा पर्याय दिसेल.
या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला ओटीपी इंटर करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला आदर्श संबंधित सर्व तपशील दिसणार आहे.
येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही हे पाहता येणार आहे. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे.
यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन केवायसी अपडेट करावे लागणार आहे. मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
यामुळे जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर हे काम करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.