भारतामध्ये अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे असून सध्या भारतमाला परियोजनाअंतर्गत देखील अनेक मोठमोठी एक्सप्रेसवे यांचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या बांधण्यात येत असलेल्या एक्सप्रेस वे वर अनेक ठिकाणी मोठमोठे पूल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक किलोमीटर लांबीची बोगद्यांची निर्मिती देखील करण्यात येत आहे. असे एक्सप्रेसवे उभारताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे पुलांची आणि रस्त्यांची उभारणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण भारतातील सर्वात लांब पूलाचा विचार केला तर तो आसाम राज्यातील दिब्रुगड या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे व या पुलाचे नाव आहे बोगीबिल पूल होय. या पूलामुळे अप्पर आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यातील लोकांच्या वाहतुकीमध्ये खूप सहजता आलेली असून 4.9 km लांबीचा हा पूल आशियातील दुसरा सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जातो. हा लोखंडी पूल असून भारतीय रेल्वे कडून हा पूल उभारण्यात आलेला आहे. परंतु या पुलाचे जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर हा डबल डेकर पूल असून या पुलावरून गाड्या आणि रेल्वे दोन्ही धावतात.
या पुलावरून रेल्वे आणि गाड्या दोन्ही धावतात
आसाम राज्यातील बोगीबिल पूल हा सर्वात लांब रेल्वे आणि रोड फुल असून हा डबल डेकर पूल आहे. या पुलावरून रेल्वे आणि गाड्या दोन्ही धावू शकतात. या फुलाच्या वरच्या भागांमध्ये तीन पदरी रस्ता असून खाली दोन रेल्वे ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत. हा अत्यंत मजबूत असा पूल असून यावरून लष्कराचे रणगाडे देखील आरामात जाऊ शकते. या पुलाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अरुणाचल प्रदेश राज्यातील धेमाजी जिल्ह्याला आसाम राज्यातील दिब्रुगडशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
Did You know ?
Bogibeel Bridge on the Brahmaputra river is India's first fully welded steel Rail-cum-road bridge with no joints. pic.twitter.com/DHlzC1E5A2
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 30, 2023
या 4.9 km अंतराच्या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानचा प्रवास तब्बल चार तासांनी कमी झाला आहे. त्यासोबतच दिल्ली ते दिब्रुगड या रेल्वे प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होऊन 34 तासांवर आले असून हे अंतर पूर्ण करण्यासाठी अगोदरच 37 तास लागत होते. अनेक प्रकारच्या अडचणी व आव्हानांचा सामना करत हा पूल उभारला गेलेला आहे. जर आपण बोगीबिल मधील ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी पाहिली तर ती साधारणपणे दहा किलोमीटर आहे. रेल्वेच्या माध्यमातून हा पूल बनवण्यात आला असून या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे व चक्क ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी कमी करण्यात आली व त्यावर पाच किलोमीटर लांबीचा रेल्वे आणि रस्ते पूल बांधण्यात आला आहे.
या पूलाचा जर आपण इतिहास पाहिला तर हा प्रकल्प आसाम करार 1985 चा एक भाग असून 1997 ते 98 मध्ये याला मंजुरी मिळाली होती. त्यावेळचे पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 22 जानेवारी 1997 रोजी या पूलाची पायाभरणी केली होती व त्यानंतर या प्रकल्पाचे काम तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात 21 एप्रिल 2022 ला सुरू झाले व 2018 मध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त या प्रकल्पाची सुरुवात आता करण्यात आलेली आहे.