Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची आणि नववर्ष सुरू होण्यापूर्वीच एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई, कल्याण नाशिक, जळगाव शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे. कारण की मध्य रेल्वे मार्गावर एक नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते उत्तर प्रदेश येथील मऊ रेल्वे स्थानकादरम्यान साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वेने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही गाडी नासिक, जळगाव, भुसावळमार्गे जाणार असल्याने या गाडीचा खानदेश मधील रेल्वे प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे.
खरतर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. रेल्वेचा प्रवास हा तुलनेने स्वस्त आणि जलद होत असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळतो.
हेच कारण आहे की, मध्य रेल्वेने एलटीटी ते मऊ दरम्यान नवीन साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार साप्ताहिक गाडीचे वेळापत्रक
मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एलटीटी-मऊ एक्सप्रेस ट्रेन येत्या दोन दिवसात अर्थातच 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. म्हणजेच साप्ताहिक गाडी राहणार आहे. ही गाडी दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.१० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता मऊ रेल्वे स्थानकावर पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच मऊ-एलटीटी एक्सप्रेस ट्रेन कालपासून म्हणजे १६.१२.२०२३ पासून सुरु झाली आहे. ही गाडी देखील आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही साप्ताहिक ट्रेन दर शनिवारी २२.१५ वाजता मऊ रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ०३.४५ वाजता पोहचणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून थांबवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. यानुसार ही साप्ताहिक गाडी कल्याण, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फुलपूर, जंघाई, मडियाहुन, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगढ, मुहम्मदाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.