50 Hajar Protsahan Anudan Yadi : 2014 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली. यानंतर महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (yojana) राज्यातील शेतकरी बांधवांची (farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली.
यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aghadi sarkar) ज्या शेतकरी बांधवांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
मात्र, निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच महाराष्ट्र समवेत संपूर्ण जगावर कोरोना नामक महाभयंकर आजाराचे सावट आले. या आजारामुळे जगभरातील उद्योगधंदे ठप्प झाले होते. या संसर्गजन्य आजारांचा अटकाव करण्यासाठी संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आले होते. अशा परिस्थितीत जगावर आर्थिक मंदीचे सावट होते. यामुळे त्यावेळी शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देता येणे अशक्य बनले होते. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाला असल्याने त्यावेळी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.
कोरोना नंतर मानवी जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्यानंतर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. मात्र, यादरम्यान राज्यात सत्ताबदल झाला सत्तेमध्ये असलेल्या शिवसेना पक्षातून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत बंडखोरी करून शिवसेना पक्षातून बाहेर पडले आणि महाविकास आघाडी सरकार हाणून पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आपल्या 40 आमदारांसोबत भाजपाशी सोयरीक करत राज्यात नवीन सत्ता स्थापन केली.
सत्तेत आल्यानंतर नवोदित शिंदे सरकारने पूर्वीच्या सरकारचे जवळपास सर्वच निर्णय रद्दबातलं करण्यास सुरुवात केली. मात्र नवोदित शिंदे सरकारने पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रोत्साहनपर अनुदानाचा (subsidy) निर्णय जशाचा तसाच राहू दिला. आता, प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात एक महत्वाची बातमी हाती आली आहे.
50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान याच्या याद्या आल्या
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या आता सार्वजनिक झाल्या आहेत. जवळपास अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी कवायत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राज्यातील जवळपास 28 लाख नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे. बँकांनी दिलेल्या याद्या आता छाननी झाल्या असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या आता प्रकाशित होऊ लागल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आल्या
आता राज्यातील तमाम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या तसेच ग्रामीण बँकेच्या याद्या नंतरच्या फेरीमध्ये येणार असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.
50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कुठे पाहायची
मित्रांनो, आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी बांधव प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत आपले नाव तपासू शकणार आहेत. या शिवाय शेतकरी बांधवांना सीएससी पोर्टलला देखील यादी पाहता येणार आहे. मात्र सीएससी पोर्टलला तेच व्यक्ती यादी पाहू शकतात ज्यांच्याकडे सीएससी पोर्टलचा आयडी आहे.
अर्थातच जे कॉमन सर्विस सेंटर चालवतात अशा व्यक्तींना या याद्या पाहता येणे शक्य होणार आहे. सर्वसामान्य शेतकरी बांधवांना सीएससी पोर्टलला लॉगिन घेता येणार नाही. ज्या व्यक्तीकडे सीएससी पोर्टलची लॉगिन आहे अशा लोकांना सीएससी पोर्टलला भेट देऊन प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या पाहता येणार आहेत.
CSC पोर्टलवर अशा पद्धतीने बघा
जर तुमच्याकडे देखील सीएससी पोर्टलची लॉगिन आयडी आणि पासवर्ड असेल तर आपण सीएससी पोर्टल ला भेट द्या. पोर्टलला भेट दिल्यानंतर सर्च मध्ये karj असं टाईप करा. यानंतर त्या ठिकाणी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची एक लिंक दिसेल. या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत साइटवर तुम्हाला नेले जाईल. त्या पोर्टलवर आल्यानंतर डाव्या साईडला लाभार्थी यादी म्हणजे आधार अथेंतिकेशन लिस्ट (Aadhar Authentication List) या पर्यायावर जा.
त्यानंतर सीएससी आयडी जिल्ह्याचा असेल त्या जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. यानंतर व्हिलेज लिस्टमध्ये त्या जिल्ह्यातील सर्व गावांची यादी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. यानंतर तुम्हाला ज्या गावाची प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करायची आहे आपण ती यादी डाऊनलोड करू शकता. यादी डाउनलोड झाल्यानंतर आपण यादीमध्ये आपले नाव शोधू शकता.
माहितीमध्ये तफावत असल्यास या ठिकाणी तक्रार करा
यादी डाउनलोड झाल्यानंतर यादी मध्ये नमूद केलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही याची खातरजमा करा. यादीमध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही तफावत असल्यास आपणास ताबडतोब बँकेत जाऊन ऑब्जेक्शन नोंदवावे लागणार आहे. जर यादी मध्ये असलेली आपली माहिती यथायोग्य असेल तर आपणास ताबडतोब केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्यासाठी आपण संबंधित बँक शाखेत जाऊ शकता किंवा सीएससी सेंटरला भेट देऊन देखील केवायसी करू शकता.