50 Hajar Protsahan Anudan : सध्या महाराष्ट्रात प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Subsidy) चर्चा मोठ्या रंगल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र प्रोत्साहन अनुदानाबाबत (Anudan) चर्चा केली जात आहे.
मित्रांनो गेल्या महा विकास आघाडी सरकारने (MVA) आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) 2019 अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver) घडवून आणली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन दिले जाईल अशी घोषणा केली होती. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान स्वरूपात देण्यात येणार होते.
मात्र, सरकारच्या या घोषणेनंतर कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिली. यामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन होते, उद्योगधंदे सर्व काही बंद होते. परिणामी जगात मंदीचे सावट होते. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत देखील मोठा खळखळाट होता. अशा परिस्थितीत प्रोत्साहनपर अनुदानाच्या अंमलबजावणीला मोठा ब्रेक लागला. प्रोत्साहनपर अनुदानाच्या घोषणेला आता अडीच वर्ष पूर्ण होत आलीत, ज्या सरकारने घोषणा केली ती सरकार देखील पडली आहे. मात्र आता नवोदित शिंदे सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची सुरवात केली आहे.
या अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची पहिली यादी आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाली आहे. याव्यतिरिक्तही यादी प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख तीन हजार 569 शेतकरी बांधव नियमित पीक कर्जाची परतफेड करत असून ते या योजनेसाठी पात्र झाले आहेत. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. यापैकी 37 हजार 164 शेतकऱ्यांची पहिली यादी सार्वजनिक देखील झाली आहे.
ज्या शेतकरी बांधवांची यादीमध्ये नाव आले आहे त्यांना लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकरी बांधवांना आधार कार्ड आणि यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक आवश्यक राहणार आहे. आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सीएससी केंद्रावर म्हणजेच आपले सेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती अहमदनगर जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली आहे.
मित्रांनो प्रोत्साहन अनुदानाचा लाभ पारनेर तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील 46 हजार 922 लाभार्थी शेतकरी आहेत. मात्र पहिल्या यादीत 8705 शेतकऱ्यांची नावे आली असून उर्वरित शेतकऱ्यांची नावे लवकरच येणार आहेत. संगमनेर तालुक्यातील देखील 21 हजार 883 शेतकरी या अनुदानासाठी पात्र असून पहिल्या यादीत 4190 शेतकऱ्यांची नावे आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची लवकरच नावे येणार आहेत. अकोले तालुक्यात 13,844 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र झाले आहेत यापैकी 3370 शेतकऱ्यांची पहिल्या यादीत नावे आली आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकर येणार आहे.
नगरमधील इतर तालुक्यातील पात्र शेतकरी आणि पहिल्या यादीत नाव आलेले शेतकरी संख्या
कोपरगाव- ७,४५७ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी १३२५
जामखेड- ९४७० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी २८८८
नगर- २८४१० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ५१९६
कर्जत- १४३४८ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ३५४८
पाथर्डी- २६१२८ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ३८५२
नेवासे- ७०२१ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ६०६
श्रीगोंदे- ८५६९ शेतकरी. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ८२४
राहाता- ६२१२ शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ११९१
राहुरी- ३७५८ शेतकरी, पहिल्या लाभार्थी शेतकरी ४७८
शेवगाव- ७१२० शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ७६१