पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता खात्यावर जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
तर राज्यात 25 मार्च रोजी शिबिरे राबवून शेतकऱ्यांच्या त्रुटी जाणून घेतल्या जाणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत हे काम महसूल विभागाला पूर्ण करावी लागणार आहे. राज्यातील तब्बल 8 लाख 53 हजार शेतकरी केवळ तपशिलात असणाऱ्या त्रुटींमुळे योजनेपासून वंचित राहिले आहेत. ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्यातील महसूल आणि कृषी विभागातील मतभेदामुळे ही योजना नीट राबवली जात नाही.
शिबिरादरम्यान शेतकऱ्यांच्या त्रुटी जाणून घेतल्या तर जाणारच आहेत. पण ज्या अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. त्यांची कागदपत्रे जमा करून घेऊन त्यांच्याकडून परतावाही घेतला जाणार आहे. 25 मार्च ह्या एकाच दिवशी गावस्तरावर शिबिरात शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून घेतली जाणार आहेत.
पण ह्या योजनेचा अल्पभूधारक तसेच गरजवंत शेतकऱ्यांना लाभ घेता यावा हे उद्देश ठेवूनच ही योजना 2016 पासून सुरू करण्यात आली.मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले. जे आयकर अदा करतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला. ही बाब आता काळाच्या ओघा नुसार निदर्शनात आली आहे.
तर शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तपशीलातील त्रुटी त्या दूर कराव्या लागणार आहेत.यासंदर्भात कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे.आता स्थानिक पातळीवरील शिबिरात नेमक्या काय अडचणी समोर येतात हे पहावे लागणार आहे.