10th Pass Job : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करायचे असेल अशा तरुणांसाठी ही सोने पे सुहागा अशी बातमी आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत दहावी पास ते पदवीधर तरुणांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या रिक्त पदांसाठी 6 मार्च 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज पुणे महापालिकेच्या माध्यमातून मागवले जात आहेत. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी आयोजित केली आहे भरती?
पुणे महापालिका अंतर्गत वर्ग एक, दोन, तीन पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 320 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
हे पण वाचा :- गृह कर्ज घेण्याचा विचार करताय का? मग ‘या’ बँकेतून कर्ज घ्या; महिलांना Home Loan वरील व्याज दरात मिळतेय ‘इतकी’ सूट
रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कंपाउंडर/औषध निर्माता यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. वर्ग एक ची आठ पदे, वर्ग 2 ची 28 पदे आणि वर्ग 3 ची 219 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वर नमुद करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहणार आहे. उमेदवार दहावी ते पदवीधर असणे यासाठी अनिवार्य राहणार आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर तयार होणार नवीन फ्लायओव्हर, 53 हजार कोटींची तरतूद; नितीन गडकरींची माहिती
किती मिळणार पगार
19 हजार 900 ते 2 लाख 87 हजार 700 दरम्यान पगार राहील. पद आणि श्रेणीनुसार पगार राहणार आहे.
वयोमर्यादा
वर्णमूद करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 35 वयोगटातील असणे अनिवार्य असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 43 ते 55 वर्षे वयोगटातील असला तरी या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे.
परीक्षा फी
वर नमूद केलेल्या पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फि राहणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी कोणती?
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज 28 मार्च 2023 पूर्वी करायचा आहे. या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html या अधिकृत संकेतस्थळावर एकदा भेट द्यावी लागेल.