10th Pass Job : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत धुळे एसटी आगारात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या पदांसाठी पदभरती राबवली जात आहे, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती, किती पदांसाठी भरती होणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
धुळे आगारात कोणत्या पदांसाठी होणार भरती
शिकाऊ उमेदवारासाठी ही पदभरती राबवली जात आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 110 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून अर्जासोबत बायोडेटा, दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, स्कूल लिविंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय धुळे या ठिकाणी हा अर्ज उमेदवाराला सादर करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर केला जाऊ शकणार आहे. अर्थातच आज पासून दोन दिवस मुदत संबंधित इच्छुक उमेदवारांना राहणार आहे. यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या असावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने एकदा जाहिरात आवर्जून बघावी.
अर्जासाठी किती फी लागणार
ओपन कॅटेगरी अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला पाचशे रुपये अर्ज फी या ठिकाणी लागणार आहे. मात्र मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मात्र अडीचशे रुपये या ठिकाणी लागणार आहे.
जाहिरातीची पीडीएफ
राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत भरल्या जाणाऱ्या या पदभरतीचीं जाहिरात पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे पदभरती 2023 यावर क्लिक करा.